महायुती सरकार महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी कटिबद्ध ; जे पी नड्डा

नाशिक : दि.१५ (विशेष प्रतिनिधि) : भारतीय जनता पार्टी , नाशिक महानगर यांच्या वतीने आयोजित विकसित भारत विकसित महाराष्ट्र या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी नाशिक येथे संवाद साधला. यावेळी मान्यवरांना संबोधन करताना त्यांनी संगितले की
फार्मा, ऑटोमोबाईल, कनेक्टिव्हिटी किंवा लोककल्याणकारी योजना असो, भारताने या सर्वच क्षेत्रात कायापालट करणारे बदल पाहिले आहेत, ज्यामुळे नागरिकांचा जीवनस्तर उंचावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकार महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. तथापि, महाविकास आघाडी सरकारने मुंबई मेट्रो, धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि अटल सेतू प्रकल्प यासारख्या प्रमुख विकास प्रकल्पांना अडथळा आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता अशा शक्तींना नाकारणार आणि राज्य निरंतर प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर राहील याची खात्री आहे. तसेच आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा महायुती सरकार निवडून द्या असे आहावन उपस्थित मान्यवरांना केले.
यावेळी नाशिक शहरातील भाजपा महायुतीचे नाशिक मध्यचे उमेदवार देवयानी फरांदे, नाशिक पश्चिम च्या सीमा हिरे व नाशिक पूर्वाचे राहुल ढीकले व्यासपीठावर उपस्थित होते.