क्रीडा व मनोरंजन
दुसर्या कसोटीत पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या १ गडी गमावून 86 धावा

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 च्या ॲडलेड ओव्हल येथे चालू असलेल्या दुसर्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया 94 धावांनी पिछाडीवर आहे तर नाणेफेक गमावल्यानंतर दुसऱ्यांदा खेळताना ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमावून 86 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताचा डाव 180 धावांवर आटोपला.