ताज्या घडामोडी
मेट्रो प्रकल्पाला चालना देणार ; नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे

नवी दिल्ली : (दि. १३) : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन २०२१ च्या अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोची घोषणा केली होती. मात्र, चार वर्ष झाले तरी त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेत त्याबाबत सवित्तर चर्चा करत नाशिक मेट्रो प्रकल्पाला चालना देण्याची मागणी केली.
टाईम बाऊंड काम केल्यास आगामी कुंभमेळ्याच्या आधी प्रकल्प बऱ्यापैकी पूर्णत्वास येईल असे यावेळी राजाभाऊ वाजे यांनी आपले मत मांडले. नाशिकची वाढती लोकसंख्या, शहराचा वाढता विस्तार, वाहतूक कोंडीच संकट, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील अतिरिक्त भार लक्षात घेता नाशिकमध्ये मेट्रो होणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी राजाभाऊ वाजे यांनी संगितले.